
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या महिलांचा मेळावा सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा उद्या दोन मे रोजी दुपारी ३.३० वा. वैश्यभवन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सुमारे एक हजार महिला याप्रसंगी उपस्थित राहणार असून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सौभाग्यवती निलम राणे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यावेळी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड. निता कविटकर यांनी दिली.
लोकसभा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असून महिला दीड लाखांहून अधिकच मताधिक्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामागे उभं करणारं असल्याचा विश्वास अँड. निता कविटकर यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, मतदारसंघात मोठा पाठिंबा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळत आहे. पाचही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह शहरातून सर्वाधिक लीड हे राणेंच्या मागे असेल. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे म्हणून जनता आमच्यासोबत राहील. त्याची पोचपावती राणेंना मिळणाऱ्या मताधिक्यातून असेल असं मत व्यक्त केले.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अँड. निता कविटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, भाई देऊलकर, एकनाथ नारोजी आदी उपस्थित होते.