खांबाळेत शिवजयंती उत्साहात

खांबाळे शिवसेना शाखा व मंगेश लोके मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 13, 2023 11:45 AM
views 104  views

 जिल्हा प्रमूख सतिश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती 

वैभववाडी-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे जयंती शुक्रवारी ता.१० मार्च २०२३ रोजी साजरी करण्यात आली.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

     शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सरपंच गौरी पवार यांचे हस्ते करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुंबई निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाकर लोके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

     या कार्यक्रमाला सायंकाळी नूतन जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांनी भेट दिली.यावेळी श्री सावंत व सुशांत नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        यावेळी उपसरपंच गणेश पवार, सोसायटी माजी चेअरमन दीपक चव्हाण, माजी सरपंच विठोबा सुतार, जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार, रामदास पवार,माजी उपसरपंच लहू साळुंखे, दीपक पवार, रुपेश कांबळे, गणेश सदाशिव पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, सोसायटी सचिव सिद्धेश रावराणे, मंदार पालकर,संकेश पवार, मेघनेश पवार, प्रसाद कदम, सुनिल गुरव, मिलिन पवार, दिनेश पालकर,मंगेश कांबळे,जयेश पवार,पंकज चव्हाण,राजेंद्र पवार,बाळा गुरव, समीर पवार,किशोर सुतार,प्रभाकर पवार,संदीप पवार,प्रशांत गुरव, बळीराम सावंत,महादेव पवार, प्रभाकर पाताडे आदि गावातील ग्रामस्थ व शिवसैनिक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सायंकाळी ४.०० वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ६.०० वाजता केंद्र शाळा खांबाळे येथील बाल कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा सादर केली .