
सावंतवाडी : गेली साडे चार शतके उलटून गेली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्याचे हे स्मारक येथील युवा पिढी साठी, विद्यार्थी, वाटसरूसाठी वेळोवेळी छत्रपती शिवरायांच्या आदर्शांशी जाणीव करून देत राहील.विचार आचार येथील दशक्रोशी मधील प्रत्येकामध्ये भिनले जाऊन युगप्रवर्तक हिंदू राष्ट्रासाठी हा सोहळा खारीचा वाटा ठरेल.असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सावंतवाडी उपसभापती तसेच छत्रपती कला क्रीडा मंडळ,विलवडे अध्यक्ष विनायक दळवी यांनी व्यक्त केले.
विलवडे दशक्रोशी शिवप्रेमी,विलवडे छत्रपती कला क्रीडा मंडळ आणि राजा शिवाजी विदयालय यांच्या संयुक्त माध्यमातून विलवडे हायस्कुलच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महारांजाच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण विनायक दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे,समाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे,विलवडे सरपंच प्रकाश दळवी,कृष्णा सावंत,सरमळे सरपंच विजय गावंडे,ओटवणे सरपंच आत्माराम गावकर,भलावल सरपंच समीर परब,वाफोली सरपंच उमेश शिरोडकर,तांबोळी सरपंच वेदिका नाईक,कोनशी सरपंच साधना शेट्ये,कृष्णा सावंत,बाळकृष्ण दळवी,रवींद्र म्हापसेकर,विष्णू देऊळकर ,संतोष कासकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या ध्वजाचे अनावरण तर सरपंच प्रकाश दळवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या नाम फलकाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी दशक्रोशीतील शेकडो शिवप्रेमी संवाद्य मिरवणूकिसह पारंपारिक वेषात उपस्थित झाले होते.यावेळी विलवडे छत्रपती महाराज चौक महारांजाच्या नाम जयघोषात दुमदुमून गेला होता.मंडळाच्या या आयोजित केलेल्या सुंदर सोहळ्याचे सर्वच मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक भ.दी.हेवाळेकर,परेश धरणे,सोनू दळवी,प्रमोद दळवी,आत्माराम दळवी,मोहन दळवी,दिनेश सावंत,सुरेश सावंत,संभाजी दळवी,सूर्यकांत दळवी,मदन कांबळे,विलवडे हायस्कुल चे आजी माजी विदयार्थी,दशक्रोशीतील ग्रामस्थ ,महिला वर्ग या शिवशाही जगारात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मदन कांबळे तर सूत्र संचालन राजा सामंत यांनी केले.