शिवाजी महाराज दूरदृष्टी असलेले राजे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Edited by:
Published on: December 04, 2023 17:35 PM
views 311  views

मालवण : नौसेना दिनास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तारकर्लीत आगमन झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत भारताचा नौसेना दीन साजरा होणार आहे. प्रचंड जनसमुदाय हा दांडी पासून तारकर्ली, देवबागच्या किनाऱ्यावर हा कार्यक्रम पाहण्यासाठी एकवटलेला आहे. अवघ्या काही क्षणात संपूर्ण देशवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचलेला नौसेना दीन साजरा होणार आहे. नौदलाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. 

यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असलेले राजे असल्यास सांगितलं. त्याचबरोबर भारतीय नौदलाच्या कामगिरीचं कौतुक केलं.     

पंतप्रधान ज्या मार्गाने तारकर्लीत दाखल झाले आहेत त्या सागरी महामार्ग, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका येथून तारकर्ली एमटीडीसी पर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह अन्य अतिमहनिय व्यक्ती उपस्थित आहेत.