
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. श्री देव कुणकेश्वर व छत्रपती शिवरायांचे नाते हे ऐतिहासिक आहे.छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात असणारे अमात्य नारो निळकंठ यांची समाधी कुणकेश्वर मंदिराच्या सर्वाधिक निकट स्थानी आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार हा छत्रपतींच्या आज्ञेने झालेला आहे. छत्रपती शिवराय हा कुणकेश्वर ग्रामस्थांचा अभिमानाचा विषय आहे. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळी देवस्थान ट्रस्टच्या हॉलमध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातील खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये व्याख्यान शिवशंभू विचार दर्शन, प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवकालीन नाणी प्रदर्शन,मोडी दस्तऐवज,प्राचीन खेळ,छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित पुस्तक विक्री,छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनकार्यावर व्याख्यान सायंकाळी ६ वाजता देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट देवस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.