
सावंतवाडी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावंतवाडी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्रीच्या दिवसांत सावंतवाडी शहरात दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील तमाम हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरात गेली 10 वर्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावंतवाडीच्यावतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे याहीवर्षी घटस्थापनेच्या दिवसांपासून विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. उभाबाजार येथील शिवतीर्थापासन प्रत्येक दिवशी शहरातील एका देवीकडे जाऊन देव, देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळ देण्याचे मागणे मागणार आहोत अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यानी दिली आहे. घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत रोज सकाळी सव्वा सहा वाजता या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत अधिक माहितीसाठी 7768904916 या क्रमांक वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










