
सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन झाल्यामुळे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला नाट्य महोत्सव रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी दिली आहे.
विकास सावंत यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सावंतवाडीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला नाट्य महोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले. तसेच शहरातील इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी दिली.