
सावंतवाडी : वेत्ये येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे थेट सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे आणि सदस्य पदाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या पॅनलला वेत्येतील मतदारांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे. डोअर टू डोअर जात प्रचारावर त्यांनी भर दिलाय. विकासाचे व्हिजन घेऊन प्रचाराचा झंझावात गावात सुरू आहे. त्यांच्यासोबत असलेली युवा पिढी आणि गावातील राजकीय मंडळी लक्षात घेता गुणाजी गावडे प्रचारात आघाडीवर आहेत. आपली निक्षाणी रिक्षा घरोघरी पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या, प्रत्यक्षात प्रचारात उतरवलेली रिक्षा असा हटके अंदाज गावडे यांच्या प्रचारात पहायला मिळत आहे. युवा पिढीचा खंबीर पाठिंबा त्यांच्या सोबत असून गावागावात गुणाजी गावडे, त्यांच पॅनल व हटके प्रचाराची चर्चा सुरू आहे.
यावेळी वेत्ये पंचवार्षिक निवडणूक ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनल मधून रिक्षा ही निशाणी घेवून मी निवडणूक लढवित आहे.मला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असून माझे वडील माजी सरपंच अर्जुन गुणाजी गावडे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा घेऊन जिल्हापातळीवर सामाजिक कार्यात वयाच्या १८ व्या वर्षापासून अग्रेसर राहीलोय. तसेच समाजात राजकीय पदाच्या सहाय्याने तसेच मागील ५ वर्षे उपसरपंच पद भूषवून गावात युवा संघटना बळकट करुन विविध विकास कामे, लोकांच्या आरोग्य, शिक्षण - कला क्रीडा तसेच प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळात सर्वांच्या मार्गदर्शनाने खंबीरपणे अग्रेसर राहीलो. अपघातग्रस्तांना वेळोवेळी तातडीची वैद्यकीय सेवा पुरविली. त्यामुळे आता पुन्हा एकदा गावाची सेवा करण्याची संधी मला ग्रामस्थ देतील.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, माजी सभापती रमेश गांवकर म्हणाले, गेली २५ वर्ष वेत्ये गाव शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला आहे. आज जरी पक्षात दुफळी निर्माण झाली असली तरी देखील आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोबतच ग्रामस्थ राहणार आहेत. तसा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे चारही उमेदवारांसह सरपंच म्हणून गुणाजी गावडे विजयी होतील असा विश्वास आहे.
महिला, तरूणांसह अबालवृद्धांची साथ आम्हाला आहे. गावच्या सुख-दुःखात नेहमीच आम्ही ग्रामस्थांसोबत राहिलोत. त्यामुळे वेत्येवासीय माझ्यासह गुणाजी गावडे यांना थेट सरपंच म्हणून निवडून देतील असा विश्वास सदस्य पदाचे उमेदवार भगवान उर्फ सुनील गावडे यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे, सदस्य पदाचे उमेदवार सुनिल गावडे, माजी सभापती रमेश गांवकर, बाळु गावडे, शरद जाधव, मारूती गावडे, सुरेश सातार्डेकर, विश्राम गावकर, प्रकाश गावडे, गोविंद गावडे, मधूकर गावडे, सत्यवान गावडे, संतोष गावडे, संदिप गावडे, मनोज पाटकर, प्रदीप जोशींसह गुणाजी गावडे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते.