शिवसेनेचा प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचाराचा झंझावात

अजय गोंदावळे, पूजा आरवारी यांची प्रचारात आघाडी
Edited by: विनायक गांवस
Published on: November 21, 2025 20:15 PM
views 72  views

सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांनी झंझावाती प्रचार सुरू केला आहे. जोरदार प्रचार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कार्यकर्त्यांची साथ, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे. या प्रभागातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत कविटकर यांना मताधिक्य देण्याबरोबरच माझ्यासह सहकारी उमेदवाराला प्रचंड मताने विजयी आणणार असा दावा श्री. गोंदावळे यांनी केला.

 प्रभाग क्रमांक ९ मध्ये अजय गोंदवळे व पूजा आरवारी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारावर जोरदार भर दिला आहे. श्री. गोंदावळे व सौ. आरवारी यांनी कार्यकर्त्यांसमवेत विकासाचे व्हिजन पोहोचविले आहे. मतदारांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या त्या भागातील विकास कामांची नोंद ते घेत आहेत. एकूणच दोघांच्याही कामावर आणि विकासाच्या व्हिजनावर लोकांचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा समस्या याच माझ्या समस्या समजून भविष्यात त्या दृष्टीने मी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून काम करणार आहे. तसेच या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह दोन्ही उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन श्री. गोंदावळे यांनी केले आहे. यावेळी बिट्टू सुकी, संतोष मठकर, अरूण पडवळ, शितल गोंदावळे, संजय गोसावी, बास्तिव फर्नांडिस, अमित नाईक आदी उपस्थित होते.