
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेना उमेदवार खेमराज उर्फ बाबू कुडतरकर व सौ. संजना पेडणेकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला.नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्या उपस्थितीत झंझावाती प्रचार यावेळी करण्यात आला. एकमुखी दत्त मंदिरात आशीर्वाद घेत त्यांनी प्रचार शुभारंभ केला.
शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक पदासाठीचे उमेदवार बाबु कुडतरकर म्हणाले, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आम्ही विकासकाम केलीत. आम. केसरकर, आम. निलेश राणेंची साथ आम्हाला आहे. त्यामुळे माझ्यासह सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हाप्रमुख संजू परब आमच्यासोबत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या मागे आता दोघांची ताकद उभी राहिलेली दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, उमेदवार संजना पेडणेकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, माजी नगरसेविका दिपाली सावंत, विशाल सावंत, सुधीर धुमे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











