वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना काढणार निषेध मोर्चा

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 12, 2023 15:29 PM
views 226  views

कणकवली : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर  शिंदे -फडणवीस सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला.  वारकऱ्यांवर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसील कार्यालयावर  आज सायंकाळी ४ वाजता निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.