वैभववाडीतही शिवसेनेला बसणार धक्का !

आजी - माजी पदाधिकारी शिंदे गटात होणार दाखल ?
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 13, 2022 13:52 PM
views 646  views

वैभववाडी : शिवसेनेच्या फुटीनंतर त्याचा हादरा आता वैभववाडीतही बसणार आहे. तालुक्यातील शिवसेनेचा एक गट शिंदे गटात सामील होणार आहे.तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईत यासंदर्भात गाठीभेटी सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग 

राज्यात तीन महीन्यापुर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे पडसाद उमटले होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह इतर तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. या तुलनेत वैभववाडी तालुक्यात शिवसेना पदाधिकारी जैसे थे होते. मात्र शिंदे गटाला पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर येथील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची पक्षप्रवेशाची हालचाल सुरू झाली आहे.

ठाकरे गट मुंबईत ठाण मांडून 

तालुक्यातील शिवसेनेचा एक गट मुंबईत ठाण मांडून आहे. शिंदे गटातील नेत्यांसोबत त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. येत्या काही दिवसांत ते प्रवेश करणार आहेत. त्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यास तो पक्षासाठी मोठा धक्का असू शकतो. त्या पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटात जण्याची कुजबुज कानी आल्यावर त्यांना महत्त्वाचे पद वगैरे देऊन मनधरणी करण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न देखील सुरू आहे.