
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात ही लोकसभेची जागा शिवसेना लढवणार ही एक काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे विनायक राऊत यांनी ही जागा शिवसेनेला मिळणार नाही आणि भाजप लढवणार असं जे विधान करणारे विनायक राऊत हे नेमके कोण आआहेत?त्यांना ही जागा घोषित करण्याचा अधिकार कोणी दिला? असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. वेंगुर्ला येथील आपल्या निवासस्थाने गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आपले बंधू किरण सामंत हे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार असणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत यांनी स्पष्ट केले की किरण सांमंत यांनी ही जागा लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव त्यांच्यावर आहे. आणि त्यांनी हा लवकरच राजकीय निर्णय घ्यावा.अस सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे ठाम मत आहे.किरण सामंत यांनी ही जागा लढवली तर निश्चित आपल सगळ कुटुंब त्यांच्या पाठीशी असून तीन ते साडेतीन लाखा पेक्षा जास्त मतांनी किरण सामंत विजयी होतील असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.तर भाजपच्या नेत्यांनी उगाचच या जागेवर शिवसेना-भाजपमध्ये युतीमध्ये तणाव निर्माण होईल अशी विधाने करू नयेत. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यापैकीच ही एक जागा असल्याचे सांगत शिवसेना ही जागा निश्चित लढवेल. याचं कारण मी पण एक या कोर कमिटीचा सदस्य असून शिवसेनेचा उपनेता असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट घालवून आपण सहा लाखाच्या मताधिक्याने विजय होवू असे काहीजण दावा करत आहेत. याचा अर्थ समोरच्याला एकही मत पडणार नाही आणी सगळिच मत ह्याना पडणार आहेत.असा त्याचा अर्थ होतो का? आणि सगळीची सगळी मतं ह्या लोकांनाच पडणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत विनायक राऊत यांच्या तिसर्यांदा विजयी होण्याच्या दाव्याला उदय सामंत यांनी जोरदार टोला लगावला आहे. किरण सामंत हे या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनीही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची जोरदार इच्छा आहे. यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव त्यांच्यावर आहे. किरण सामंत यांनी लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी आणि निर्णय लवकर घ्यावा. म्हणजे जोमाने काम करता येईल. जर का ते ही जागा लढवण्यासाठी इच्छुक असतील आणि पक्ष त्यांना उमेदवारी देत असेल तर निश्चितच संपूर्ण सामंत कुटुंबीय त्यांच्या पाठीशी असून किमान तीन ते साडेतीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ते विजयी होतील आणि केंद्रामध्ये मोदींचे हात आपण बळकट करू. असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत ही सगळ्यांची इच्छा आहे. ही शिवसेनेची जागा आहे. या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार लडेल आणी युतीचाच उमेदवार विजयी होईल. भाजपच्या कार्यकर्त्याने विरोधाभास होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये. असे आपण त्यांना आवाहन करू इच्छित आहे.जेणेकरून युतीमध्ये दरी आणि तणाव निर्माण होईल. यासाठी शिवसेना आणी भाजप कार्यकर्त्यांनी बोलताना सांभाळून वक्तव्य करावीत. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तर शिवसेना ही जागा लढवणारच असल्याचाही दावा त्यानी यावेळी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत हेच उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाल आहे.