
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. या जिल्ह्यात शिवसेना पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मुख्यमंत्री आणि मी एकत्र नगरसेवक होतो. शिंदे दिवसांतून २० तास काम करतात. सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आज रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याच लोकसभेच प्रमुख पद मला देण्यात आलं आहे. या संधीच सोन करेन, खेडला १९ तारीखला मुख्यमंत्री येत आहेत. त्यानंतरचा दुसरा मेळावा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. भव्यदिव्य मेळावा करण्यास आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदवर शिवसेनेचा झेंडा फडकवायच काम करू, असं मत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी व्यक्त केले.