
कुडाळ : ओरोस बुद्रुकमध्ये भाजप पुरस्कृत गाव विकास पॅनलने आपलाच यावेळी विजय होणार असल्याचा विश्वास भाजपचे युवा नेते अनंतराज पाटकर यांनी व्यक्त केला आहे. भाजप युवा नेते भाई उर्फ आनंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया वालावलकर,अनंतराज पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल ओरोस मध्ये शिवसेना गटाला दणका देणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे. ओरोस मध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून यासाठी अभियान राबविण्यात येईल, असं प्रतिपादनही अनंतराज पाटकर यांनी केल आहे. शिवसेनेला लोक आता घरी बसवतील असाही टोला लगावला आहे. सत्ताधारांनी ग्रामपंचायत वीस वर्षे मागे नेली यामुळे मतदार शिवसेनेला धडा शिकवतील असा दावा भाजपचे अनंतराज पाटकर यांनी केला आहे.