
सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व सौ. वेदीका परब यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांसह उबाठा शिवसेनेच्या सायली शिंदे, प्राजक्ता बांदेकर, इम्रान शेख, जावेद शेख, सुजाता शिंदे, नेहा तावडे, पुजा मिशाळ आदींसह प्रभाग क्रमांक ३ मधील शेकडो जणांनी भाजपात प्रवेश केला. नगरपरिषद निवडणुक ऐन टप्प्यात आलेली असताना शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी नगरसेविका शुभांगी सुकी या शिवसेना पक्षात कार्यरत होत्या. श्री. सुकी देखील उपनगराध्यक्ष राहिले असून १० वर्ष कार्यरत होते. आज या दोघांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, सौ. वेदीका परब, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, रविंद्र मडगावकर, केतन आजगावकर, मोहिनी मडगावकर, शर्वरी गावकर, रेश्मा सावंत, मानसी धुरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











