
वेंगुर्ले : शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, तालुका उपाध्यक्ष सलील नाबर, युवक तालुका अध्यक्ष शुभम नाईक यांच्यासहित ७० जणांनी प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या अर्चना घारे परब याना हा जोरदार धक्का मानला जात आहे.
वेंगुर्ले तालुक्यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विकासाची गंगा आणली आहे. जिल्हा समन्वयक सचिन वालावकर हे तालुक्यातील विविध विकासकामांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. मंत्री केसरकर यांच्या राज्यातील नेतृत्वामुळे वेंगुर्ले तालुक्यातील विकासाला वेग आला आहे. त्यामुळे दीपक केसरकर व सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहीत, अशा भावना प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड, न्हैचीजाड, शिरोडा, वायंगणी, सुरंगपाणी, मठ व वेगुर्ते शहर या भागातील सुमारे ७० युवक, युवती, महिलांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगुर्ले शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, तालुका उपाध्यक्ष सत्तीम नाबर, युवक तालुकाध्यक्ष शुमम नाईक व यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
शिवसेनेचे सर्व महत्वाच्या पदाधिकाचांनी प्रवेशकत्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर, महिता उपजिल्हाप्रमुख अर्चना पांगम, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम, गजानन नाटेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवक तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवक शहर प्रमुख सागर गावडे, कौशिक परब, रवी पेडणेकर, उमेश आरोलकर, सावंतवाडी तालुका महिला प्रमुख यशस्वी सौदागर, तळवडा विभाग महिला प्रमुख चैत्राली गावडे, भोमवाडी सरपंच विद्या वाडकर आदी यावेळी उपस्थित होते.