घोटगेतील आपदग्रस्त कुटुंबाला शिवसेनेनं दिला आधार

सरपंच भक्ती दळवी यांच्या हस्ते मदत सुपूर्त
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2023 14:13 PM
views 202  views

सावंतवाडी : घोटगे गावातील कै. सिध्देश शांताराम दळवी यांच्या कुटुंबाला दोडामार्ग तालुका शिवसेनेच्यावतीने घोटगे गावच्या सरपंच सौ. भक्ती भरत दळवीच्या हस्ते आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. घरच्या कर्त्या मुलग्याचे अकस्मात निधन झाल्याने आईवर दू:खाचा डोंगर कोसळला आणि घरची आर्थिक बाजू दयनीय झाली होती, या कुटुंबाला शिवसेनेनं आधार दिला आहे.


कै. सिध्देश शांताराम दळवी हा घरचा कमवता कर्ता पुरुष होता. सिध्देश दळवी यांच्या वडिलांचे निधन आठ वर्षापूर्वी झाले. वडिलांच्या पश्चात लहान भाऊ व आई यांची जबाबदारी सिध्देशवर आली. मोलमजुरी करून सिध्देश आपले कुटुंब चालवत होता. मात्र पंधरा दिवसापूर्वी नदीतून चालत येत असताना त्याला अचानक चक्कर येवुन तो नदीत कोसळला. त्याचवेळी त्याच्यासोबत कोणीच नव्हता. चक्कर येवुन पाण्यात पडल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू  झाला.


काही वर्षापूर्वी वडीलांचा व आता मुलाचा मृत्यू झाल्याने सिध्देशच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला नव्हे तर त्याच्या कुटुंबियाना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते. ही बाब सरपंच सौ. दळवी यांनी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचेकडे मांडली. त्यानंतर गवस यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दळवी कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य केलं.

 

बुधवारी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, गुरु नाईक यानी भेट देत मंत्री केसरकर यानी दिलेली आर्थिक मदत घोटगे सरपंच सौ. भक्ती दळवी यांच्या हस्ते दळवी कुटुंबाला देण्यात आली.


यावेळी उपसरपंच विजय दळवी, कानू दळवी, परशुराम दळवी, शरद दळवी, राजाराम दळवी, दिपक दळवी आदी उपस्थित होते.