दोडामार्गमध्ये शिवसेना पदाधिकारी प्रचारासाठी ऑनग्राऊंड

Edited by:
Published on: October 28, 2024 12:01 PM
views 87  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारार्थ तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली पहिली फेरी पुर्ण करण्यात आली आहे. ऍड. नीता सावंत कविटकर तालुकाप्रमुख चेतना गडेकर या महिला पदाधिकारी कार्यकर्त्याहि दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ, मणेरी व माटणे या तिन्ही जिल्हा परिषद मतदार संघात बेसिक संघटना व महिला पदाधिकारी यांनी गावावर बैठका घेतल्या आहेत. 

तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा पदाधिकारी राजू निंबाळकर, शैलेश दळवी यांसह उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, भगवान गवस, गोपाळ गवस,  रामदास मेस्त्री, मायकल लोबो, संदीप गवस यांसह तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, सरपंच झटून कामाला लागले आहेत.  कोनाळ विभागात मोर्ले बागवाडी, घोडगेवाडी, कोनाळ , पाळये या  गावातील प्रचाराच्या बैठकी घेत महिलांनी प्रचार केला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख सौ. अँड नीता सावंत, महिला ता. प्रमुख सौ. चेतना गडेकर, उपजिल्हाप्रमुख सौ. मनिषा गवस, उपतालुकाप्रमुख सौ. लक्ष्मी करमळकर, घोडगे सरपंच सौ.भक्ती दळवी, विभाग प्रमुख दिव्या दळवी, सौ. चेञाली गावडे यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

तर दोडामार्ग शिवसेना कार्यालयातहि विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात शहरातील  मतदारांच्या गाठीभेठी संदर्भात दोडामार्ग शहरप्रमुख योगेश महाले व युवासेना शहर प्रमुख गोकुळदास बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यावेळेस बुथप्रमुख डांगे  संदीप रेडकर, चंद्रकांत नाईक  बेतकेकर व शहरातील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या काही दिवसात कशा पद्धतीने प्रचार करता येईल. मतदार यांच्या पर्यंत डोअर टू डोअर पोहचता येईल याच नियोजन करण्यात आलं आहे.