नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांचं शिवसेना महिला आघाडीकडून अभिनंदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 29, 2023 13:05 PM
views 216  views

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांचे शिवसेना महिला आघाडी जिल्हापदाधिकारी, तालुका पदाधिकारी महिला सदस्य यांच्या कडून विशेष अभिनंदन  करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात शिंदे शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी या महायुतीची सत्ता असून विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करून यापुढील काळात सर्वतोपरी सहकार्य व खंबीर साथ देण्याचे अभिवचन  दिले.

यावेळी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, कुडाळ तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट, मालवण तालुका प्रमुख स्मृती बांदेकर, कणकवली तालुका प्रमुख स्मिता टेमकर, फोंडाघाट सरपंच संजना आंग्रे, कणकवली महिला उपतालुकप्रमुख सरिता राऊत, मालवण उपतालुका प्रमुख निकिता तोडणकर, प्राची धुरी फोंडघाट, देवगड तालुका प्रमुख शीतल सावंत, उपतालुका प्रमुख स्वप्नाली वाल्मिकी, दिव्या कातवणकर, ग्रा प सदस्य व विभागप्रमुख मिठबाव आदी यावेळी उपस्थित होते.