
सावंतवाडी : शिवसेनेच्यावतीने कोलगाव माध्यमिक विद्यालयातील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या संकल्पनेतून या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक यानी शिवसेनेचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे माजी कोलगाव विभाग अध्यक्ष सुशांत ठाकूर, कोलगाव विभागीय महिला प्रमुख अँड शितल अभिजीत टिळवे, ग्रामपंचायत सदस्या सौ प्रणाली टिळवे, नितीन पेडणेकर, विद्येश धुरी, वैष्णव टोपले, स्वरा टिळवे, शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मेस्त्री, शिक्षक संजय महापुरे, रामचंद्र मेस्त्री, प्रकाश चव्हाण, भागोजी पाटील, मयुरी टिळवे उपस्थित होते.