
कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर आज सकाळपासून भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. कोळपे रजानगर येथील शिवसेना व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.
यावेळी कादिर भोडगे काँग्रेस बूथ अध्यक्ष, मजीद युसुफ नंदकर, मुसा नाचरे, हसन लांजेकर, इस्माईल नाचरे, शेरपुद्दीन लांजेकर, हुसेन उमर लांजेकर, बाबलाल भोडगे, कादिर हसन नाचरे, रमजान सरदार नाचरे, दाऊद हसन नाचरे, दिलेदार हाबी भोडगे, युसूफ याकूब नंदकर, लौकीक युसूफ नंदकर तसेच तौफिक लांजेकर सेना सरपंच उमेदवार, दिलावर सारंग, सद्दाम लांजेकर, अमोल जाधव, सलाउद्दीन दाऊद नाचरे, आ.आल्ली सारंग यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी आम. नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, संतोष कानडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.