शिव संस्कारतर्फे आंतरराज्यीय छत्रपती संभाजी महाराज वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

Edited by:
Published on: March 12, 2025 20:07 PM
views 27  views

सिंधुदुर्ग : स्वराज्याचे दुसरे छत्रपती महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्य दिनाच्या निमित्ताने शिवसंस्कारतर्फे महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक, गुजरात या चारही राज्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तर छत्रपती संभाजी महाराजांनी सतत नऊ वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन मोठा संघर्ष केला आणि अखेर 11 मार्च रोजी त्यांची तुळापूर येथे क्रूर हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांना कैद केल्यापासून  ते त्यांच्या हत्येपर्यंतचा महिना सर्वत्र बलिदान मास म्हणून पाळला जातो.  महाराजांचे  पूजन करून एकवेळचा अन्नत्याग करणे,अनवाणी राहणे,मिष्टान्न वर्ज्य करणे अशा पद्धतीने हा बलिदान मास पाळला जातो.  छत्रपती संभाजी महाराजांचे हे बलिदान अजरामर  तर आहेच परंतु येणाऱ्या पिढ्यापिढ्यांना  प्रेरणा आणि स्फुरण देणारं आहे. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पवित्र स्मृती जागवण्यासाठी  या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्पर्धेचे गट पुढीलप्रमाणे 

शिशुगट - ३ ते ६ वर्षे 

लहानगट - ७ ते १० वर्षे

मोठा गट - ११ ते १५ वर्षे

स्पर्धेचा व्हिडिओ दोन ते अडीच मिनिटांचा असावा. यामध्ये कोणतेही पार्श्वसंगीत वापरण्यात येऊ नये. स्पर्धेच्या सुरुवातीला आपले नाव, वय ,गाव सांगणे अपरिहार्य आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 20 मार्च आहे आपले व्हिडिओ शिव संस्कार च्या 9607827296 या अधिकृत नंबर वर पाठवावेत तसेच स्पर्धेची एन्ट्री फी रुपये 100 संस्थेचा क्यू आर कोड स्कॅन करून पाठवावी. सदर स्पर्धेचा निकाल दिनांक 29 मार्च छत्रपती संभाजी महाराज तिथीने येणाऱ्या मृत्युंजय अमावस्या म्हणजेच महाराजांच्या पुण्यतिना दिवशी जाहीर करण्यात येईल. तरी चारही राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृती जागवून त्यांना मानवंदना द्यावी असे आवाहन शिव संस्कार च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.