‘शिवसंस्कार’चा सन्मान सोहळा २ एप्रिलला ; गोव्यातील साखळी येथे होणार विजेत्यांचा सन्मान !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांची असणार उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2023 21:03 PM
views 109  views

सावंतवाडी :  येथील 'शिवसंस्कार' संस्थेच्यावतीने   घेण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धांचा 'भव्य पारितोषिक वितरण सोहळा' २ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वा. गोव्यातील रवींद्र भवन, साखळी येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती शिवसंस्कारच्या अध्यक्ष डॉ. सोनल लेले यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. रुपेश पाटील, भरत गावडे आदी उपस्थित होते.

डॉ. लेले पुढे म्हणाल्या की २ एप्रिलला संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, डिचोली आमदार चंद्रकांत शेटये, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील गणोजी शिर्के फेम स्वप्निल राजशेखर   आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी संस्थेतर्फे विशेष सन्मानाचे मानकरी  पांडुरंग बलकवडे (ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुणे),  अॅड. वल्लभ गांवस-देसाई (इतिहास अभ्यासक, गोवा), प्रभाकर ढगे (संपादक, गोवाईन न्यूज 

चॅनेल, साहित्यिक व इतिहास अभ्यासक) प्रज्ञा मातोंडकर (माध्यमिक हायस्कूल, मळगाव), अतुल मुळीक (कुडणे, गोवा), गोविंद 

साखळकर (ऐतिहासिक नाणी प्रदर्शन, डिचोली), अवधूत बिचकरे (शिवसंस्कार डिजिटल प्रसारक, कराड) तसेच 

विशेष सत्कारमूर्ती नारायण मानकर (मुख्याध्यापक, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), अनिल ठाकरे (शिक्षक, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी)

आदी उपस्थित राहणार 

आहेत.

या सन्मान सोहळ्यानंतर रात्री  ८ वा. अखिल नाट्यसृष्टीत वन्समोअर मिळवून इतिहास घडवणारा नाट्यप्रयोग 'इथे ओशाळला मृत्यू' लेखक - वसंत कानेटकर, दिग्दर्शन - गणेश ठाकूर, सादरकर्ते - शिवगणेश प्रोडक्शन्स (मुंबई)  सादर  होईल.

तसेच गोविंद साखळकर संग्रहित ऐतिहासिक नाणी प्रदर्शन देखील होणार असल्याचे डॉ. लेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तमाम शिवप्रेमी, इतिहास संशोधक व अभ्यासक यांना टीम शिवसंस्कारने 

केले आहे.