छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवजयंती उत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: February 11, 2025 18:48 PM
views 20  views

सावंतवाडी : दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार १९ फेब्रुवारी रोजी मळगाव येथे साजरा होत आहे. मळगाव येथील भिल्लवाडी ग्रुप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली, सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा, दुपारी ४ ते ६ वाजता होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मोटरसायकल व ढोल ताशा पथक, सायंकाळी ६ ते ७ वाजता लेझीम नृत्य, वेशभूषा व वकृत्व स्पर्धा, सायंकाळी ७ ते ८ वाजता स्नेहभोजन व महिला पैठणी व संगीत खुर्ची खेळ  रात्री ८ ते ९ वाजता मर्दानी खेळ, बक्षीस समारंभ व आभार प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत.

वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पांडुरंग राऊळ-९९६७३३३१००  व ८१०८५८५४७२ यांच्याशी संपर्क साधावा. या उत्सावात मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ, मळगाव ग्रामविकास मंडळ मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.