कणकवलीत शिवसेनेच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 28, 2024 13:39 PM
views 59  views

कणकवली : कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येथे शिवजयंती (तीथी प्रमाणे) साजरी करण्यात आली. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव पुतळ्यास अभिवादन  करण्यात आले.

यावेळी शिवसेना  उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, महिला उपजिल्हाप्रमुख  सरिता राऊत, कणकवली शहर प्रमुख बाळू पारकर, प्रमोद मसुरकर ,खजिनदार भास्कर राणे, उपतालुकाप्रमुख सुनील सावंत, कणकवली महिला शहरप्रमुख श्रेया टकले, कणकवली शहर शाखाप्रमुख रूपाली पोळेकर, आदि उपस्थित होते.