बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 19, 2024 14:52 PM
views 102  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल येथे सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग किल्ला, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ला, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मुरुड - जंजीरा किल्ला तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रतापगड किल्ला  च्या प्रतिकृती तयार केल्या.  या स्पर्धेचे परीक्षण श्री. झगडे सर  यांनी केले.

या स्पर्धेतून इयत्ता चौथी प्रथम क्रमांक, इयत्ता पहिली द्वितीय क्रमांक, इयत्ता तिसरी व इयत्ता दुसरी यांना तृतीय क्रमांक देण्यात आले. सहभागी व विजेत्या स्पर्धकांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. इयत्ता  सहावी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषण केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी घोषणा दिल्या. 

या कार्यक्रमासाठी शाळेच्या संचालिका मान सौ. सुलेखा राणे मॅडम, संस्थेचे डायरेक्टर संदीप सावंत सर, सापळे सर मान. झगडे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी मॅडम, शाळेतील शिक्षिका सौ. अश्विनी जाधव, शिल्पा तिवरेकर, नेहा मसुरकर, मधुरा कदम, संपदा नर, आनंद मेस्त्री, तृप्ती साळवी,सायली साबळे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामली कदम यांनी केले. तर आभार प्रेरणा चिंदरकर यांनी केले.