शिवजयंतीनिमित्त अमित गावडे यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रम !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 19, 2024 07:29 AM
views 142  views

मालवण : साळकुंभा (गावडेवाडी) येथे सोमवार १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अमित बाळकृष्ण गावडे यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी छ. शिवाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. आता दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, सायंकाळी ५ पासून तिर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता त्रिंबक येथील स्वरसंदेश कार्यक्रम, रात्री ८ वाजता श्री गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ रामगड यांचे वारकरी भजन, असे कार्यक्रम राबविण्यात आलेत. 

तरी सर्वांनी छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित बाळकृष्ण गावडे तसेच समस्त गावडे कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले आहे.