शिरोडा वेळागर ताज प्रकल्प स्थानिकाचा प्रश्न सोडवून विकास करावा

राजन तेलींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Edited by: ब्युरो
Published on: October 06, 2023 20:22 PM
views 292  views

सिंधुदुर्गनगरी : शिरोडा वेळागर येथील ताज ग्रुपचा  पंचतारांकित प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध नाही. तो लवकरात लवकर सुरू व्हावा मात्र नागरिकांचा रहिवास असलेला नऊ एकरचा भूखंड वगळावा तसेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबातील एक व्यक्तीला रोजगार देण्याची दिलेले आश्वासन  ताज ग्रुपने पूर्ण करावे  अशी मागणी वेळागर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत केल्याची माहिती भाजपा नेते  माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रथमेश तेली व अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात  व पत्रकार परिषदेवेळी बाबा नाईक, मनोज उगवेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

         शिरोडा वेळागर येथील  39 सर्वे नंबर जसा वगळण्यात आला  त्याच धर्तीवर  नागरिकांचा रहिवास असलेली, देवस्थान असलेली व रस्ते व कपाउंड असलेली फक्त 9 एकर जमीन वगळून ताज च्या ताब्यात असलेल्या 120 एकर जमिनीत विकास करावा.  ताज ग्रुप असं म्हणत आहे की सर्व जमीन मिळाल्या शिवाय ताज काम करणार नाही. असे त्यांचे म्हणणे असेल तर अनेक पंचतारांकित ग्रुप यायला उत्सुक आहेत. खरे तर ताज ग्रुपचे अनेक पंचतारांकित ग्रुप कमी जमिनीत विकसित झाले आहेत गोव्यातील एक प्रकल्पांचा 55 एकर मध्ये झाला आहे आहे. व ताज व्हिलेजचा एक प्रकल्प 28 एकर मध्ये झाला आहे. शिरोडा वेडागर येथे  त्यांच्याकडे 120 एकर जमीन आहे आहे त्यामुळे तेवढ्याच जमिनीत त्यांनी हा प्रकल्प विकसित करावा नागरिकांचा रहिवास असलेली नऊ एकर जमीन वगळावी अशी विनंती ग्रामस्थांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. असेही तेले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

      आपणही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन ग्रामस्थांची ही व्यथा मांडणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी व तेथील स्थानिकांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा याकडेही आपण त्यांचे लक्ष वेधले आहेत. हा प्रकल्प करताना स्थानिकांवर कोणताही अन्याय होऊ नये असे विनंती ही आपण सरकारकडे करणार आहोत. केवळ दोनशे रुपये दराने कवडीमोल भावाने त्यावेळी स्थानिकांच्या जमिनी घेतल्या आहेत. याची जाणीव ठेवून प्रशासन व सरकारने स्थानिकांची बाजू समजून घ्यावी अशी विनंती ही आपण करणार आहोत अशी विनंती ही आपण करणार आहोत. यात स्थानिकांवर बळजबरी होऊ नये व प्रशासनाने कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण करु नये या कडेही आपण जिल्हाधिकाऱ्याचे लक्ष वेधल्याचे राजन तेली यांनी स्पस्ट केले.