मंत्री केसरकरांच्या प्रयत्नाने शिरोडा - बांदा बस स्थानकांना नवीन झळाळी

Edited by: विनायक गावस
Published on: November 17, 2023 20:00 PM
views 223  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने शिरोडा व बांदा बस स्थानकांना नवीन  झळाळी प्राप्त होणार आहे‌ महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री व सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार  दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून शिरोडा व बांदा या बसस्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. शिरोडा बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये तर बांदा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 67 लाखाचा निधी मंजूर झालेले आहे यामध्ये बांदा बसस्थानक इमारतीचे नूतनीकरण होणार असून शिरोडा बसस्थानकाचे नूतनिकरणांसह वाहनतळाचे काँक्रीटिंग होणार आहे. आजच याची प्रशासकीय मान्यता झाली असून लवकरच हे काम पूर्ण होऊन बांदा आणि शिरोडा ही बसस्थानके प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज पद्धतीने सेवेत येणार आहेत. यासाठी प्रवाशांकडून तसेच मतदार संघातील सर्व नागरिकांकडून माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांचे आभार मानले जात आहेत.