
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील– महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षाखालील इनव्हिटेशन लीग साठी शिरगाव हायस्कूल शिरगाव च्यादोन खेळाडूंची निवड झाली आहे. या निवडीमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान वाढला आहे.
सिंधुदुर्ग टीममध्ये संकेत अजय जाधव (शिरगाव हायस्कूल) यांची निवड झाली असून, त्याचबरोबर कुणाल महेश चौकेकर (शिरगाव हायस्कूल) याची थेट West Zone Team मध्ये निवड झाल्याने आनंदाला उधाण आले आहे. हे सर्व खेळाडू दोन दोन दिवसांच्या पाच सामन्यांसाठी पुणे येथे रवाना झाले आहेत.
या घवघवीत यशामागे शिस्तबद्ध सराव, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रशिक्षक सुधीर साटम यांचे अथक मार्गदर्शन आहे. शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची अशी राज्यस्तरावर निवड होणे ही संपूर्ण विद्यालयासाठी, पालकांसाठी आणि गावकऱ्यांसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.या सर्व खेळाडूंना, त्यांच्या प्रशिक्षकांना आणि शिरगाव हायस्कूलला शिरगाव ग्रामस्थ, पालक व क्रीडाप्रेमींकडून भरभरून शुभेच्छा व अभिनंदन तसेच शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष अरुण भाई कार्ले, संस्था पदाधिकारी शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.