दिवाळी गोड करण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं : दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: October 23, 2022 15:44 PM
views 155  views

सावंतवाडी : दिवाळी गोड करण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारन केल आहे. जनतेच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा भर आहे. शिक्षण खात्यात आमुलाग्र बदल येत्या काळात होणार असून हुशार मुलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गतील मुलांच्या विकासासाठी अधिक भर देणार आहे. आनंदाच्या शिदा वाटपाच्यावेळी ऑनलाईनची अडचण ठरत असल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईनच्या माध्यमातून ताबडतोब शिदा वाटप करायला लावलं. लोक सुखी व्हावी हा आमचा मुख्य हेतू आहे असं मत व्यक्त करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.