किरण सामंतांनी आदेश दिल्याशिवाय काम नाही | शिंदे शिवसेनेचा इशारा

Edited by: भरत केसरकर
Published on: April 18, 2024 13:22 PM
views 1251  views

कुडाळ : शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. याबैठकीत शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीमधून शिवसेना पक्षाला १०% निधी दिला जाईल असा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शब्द दिल्याप्रमाणे शब्द पाळला नाही. त्याचप्रमाणे विविध समितीवर शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांच्यावर सतत अन्याय होत असल्याबाबतची भावना शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.

भविष्यात अन्याय होणार नाही याची शाश्वती काय ? फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अद्याप पर्यंत वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारची सूचना नाही. आम्हाला आमचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आदेश दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम करणार नाही. असा एल्गार शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मांडला. त्याचप्रमाणे शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी मोठ्या मनाने माघार घेतल्याबद्दल शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी कौतुक केले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख  वर्षाताई कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर, शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, शिवसेना उपतालुका संघटक संजय सावंत, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत, शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ.अनघा रांगणेकर,महिला आघाडी उपविभागप्रमुख शिल्पा आचरेकर,शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ गुरव,विभागप्रमुख जयदीप तुळसकर,चंद्रकांत राणे,प्रवीण मर्गज,पांडुरंग  राणे,राजेश तेंडुलकर,महेंद्र सातार्डेकर,राजेश तेंडुलकर,किशोर सावंत,विठोबा शेडगे,उपविभागप्रमुख रामकृष्ण गडकरी,अंकित नार्वेकर,विठ्ठल शिंदे,पुंडलिक जोशी,रामचंद्र परब,आदित्य राणे,दर्शन इब्रामपुरकर,सीताराम कदम,रुपेश नाईक, बुथप्रमुख,शिवदूत उपास्थित होते.यावेळी नाराजीचा सुर कार्यकर्त्यांनी आळवला.