युवती सेना पदाधिकारी नियुक्तीचा शिल्पा खोत यांचा धडाका

आ. वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झंझावात
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 25, 2023 22:17 PM
views 213  views

मालवण : युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून शहर व तालुका स्तरावर सातत्याने बैठका घेऊन, नव्या नियुक्त्या जाहीर करत युवती सेनेचा विस्तार व संघटन मजबुतीकरण याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे, सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा यतीन खोत व सहकारी यांचे कार्य सुरू आहे.


युवती सेनेची नुकतीच कांदळगाव येथे बैठक संपन्न झाली. यात काही पदाधिकारी नियुक्त्या शिल्पा खोत यांनी जाहीर केल्या आहेत. यात कांदळगाव वार्ड १ : शाखाप्रमुख पदी हर्षदा दिनेश पाटकर, उपशाखाप्रमुख पदी प्रियांका प्रमोद परब, वार्ड २ : शाखाप्रमुख पदी अनुष्का अमोल परब, उपशाखाप्रमुख पदी आशालता दिगंबर परब, वार्ड ३ : शाखाप्रमुख पदी साक्षी भगवान कांदळकर, उप शाखाप्रमुख पदी पूजा सिद्धार्थ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


यावेळी कांदळगाव सरपंच रणजित परब यांच्यासह उपसरपंच दिव्या बागवे, सदस्य राजेंद्र कदम, सदस्य अनघा कदम, शाखाप्रमुख दीपक परुळेकर यांसह युवती सेना मालवण उपतालुकप्रमुख रुपा कुडाळकर, शहरप्रमुख निनाक्षी मेतर, मसुरे विभाग प्रमुख आर्या गांवकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, दिया पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. मालवण तालुक्यात गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या सर्वच बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवती सेनेत काम करण्यासाठी पदांची जबाबदारी घेण्यासाठी युवतींचा पुढाकार दिसून येत आहे.