
मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व महिला युवतींना एकसंघ करून विविध उपक्रम राबविणाऱ्या शिल्पा खोत आगामी काळातही युवतींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना व्यासपीठ मिळवून देत युवतींच्या प्रगतीसाठी निश्चितच आश्वासक कार्य करतील. असा विश्वास आमदार नाईक यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.