
चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या पुणे डोणजे गाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.
या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम आणि नाना पाटेकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली. नाना पाटेकर यांनी आमदार निकम यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी चिपळूण शहराला पूरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे, तसेच शिवनदीतील गाळ याबाबतदेखील चर्चा झाली. “गणेशोत्सवानंतर मी चिपळूणला येणार आहे. त्यावेळी आपण भेटून या विषयावर सविस्तर चर्चा करू. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक आयोजित करू,” असे आश्वासन नाना पाटेकर यांनी आमदार शेखर निकम यांना दिले.
या वेळी आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक अमित सुर्वे उपस्थित होते.