चिपळूण : महाराष्ट्र राज्य विधानसभेेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून, महायुतीकडून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, शेखर निकमसर अटीतटीच्या लढतीत जोरदार मुसंडी देत विजयी झाले. शेखर निकम यांच्या विजयानंतर मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर प्रतिस्पर्धी गोटात शांतता पसरली आहे.
शेखर निकम कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांकडून ठिकाणी शेखर निकम यांचे अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. असाच एक बॅनर सावर्डे परिसरात, मुंबई गोवा महामार्गाकडेला एका खांबाला कोणाला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने लावण्यात आला होता. त्याच परिसरात इंडियन ऑईल चा पेट्रोल पंप आहे. या पंपाचे मालक वरेकर, हे सावर्डे शेजारील कोंडमाळा गावचे स्थायिक आहेत. वरेकर कुटुंब, शेखर निकम यांचे प्रतिस्पर्धी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांचे गोटात सामील असल्याने, आपला उमेदवार पराभूत झाल्याचा राग धरून, सदर बॅनर काढून आणि वरील बाजूस फाडून, पंपाच्या मागच्या बाजूस टाकून दिला. शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आल्यावर, भराभर १०० ते १५० कार्यकर्त्ये घटना स्थळावर गोळा झाले. पंप मालका विरोधात संताप व्यक्त करीत शेखर सरांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सावर्डे पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी ही उपस्थित झाले. हा बॅनर शोधून पेट्रोल पंप मालक वरेकर यांना जाब विचारत होते. त्यामुळे सावर्डे येथे काहीकाळ काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
परंतु सदर घटनेनंतर संबंधित पेट्रोल पंप मालकाने सर्वांची माफी मागून सदरचा बॅनर पुन्हा जाग्यावर लावला आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पोलीस पाटील आणि पोलिसांच्या मदतीने विषय योग्य रीतीने हाताळल्याने शांतता झाली. त्यानंतर सर्वांनी संविधानाचा आदर राखून आज 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून संविधान शपथ घेऊन सर्वांनी एक वेगळा आदर्श घालून दिला.