शेखर निकम यांना विजयाचा विश्वास

Edited by: मनोज पवार
Published on: November 16, 2024 19:33 PM
views 295  views

चिपळूण :  माणुसकी हाच सर्वोत्तम धर्म आहे.  त्यामुळे जाती पातीचे राजकारण करण्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही किंवा केले जाणार  नाही आपण व्यक्ती आणि त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत.  मतदारांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच आपला एकमेव ध्यास आहे. जनतेशी आपली नाळ जुळली असून सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या विकास कामासोबत आणि वडिलांची पुण्याई या जोरावर आपण मताधिक्य घेत निवडून येऊ असे त्यांनी सांगितले. 

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे महायुतीचे उमेदवार,  आमदार शेखर निकमांचा २०१४ च्या निवडणुकीत त्यावेळी सोबत असलेल्या काही लोकांनी दिशाभूल केल्याने निसटता पराभव झाला होता. मात्र दुसर्‍याच दिवसापासून त्यांनी जोमाने  कामाला सुरुवात केली . ते म्हणतात आमदारकी हे जनतेच्या सेवेचे माध्यम आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम  यांनी  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त करताना सांगितले की,  भविष्यातील मतदारांची वाटचाल, बेरोजगारीचा प्रश्न अशा विविध प्रश्नावर आमदारांनी भाष्य केले. आपण जातिवाद वगैरे  मानत नाही पुढे ही मांडणार नाही. स्व. गोविंदराव निकम साहेबांचे संस्कार आमच्यावरती कायम आहेत . आम्हाला माणूस कळतो.   माणुसकी हेच आमचे जीवन जगण्याचे ध्येय आहे.  कारण आमचे सर्वांचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत असे आ. शेखर निकम यांनी सांगितले. 

 माझे राजकारण माझ्या वडिलांनंतर सुरू झाले. मी सुरुवातीपासूनच अजितदादा यांच्या  सोबत काम करत आलो आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात विरोधक आरोप हे करणारच. परंतु आपण यांना विकास कामातूनच उत्तर देऊ. आपल्यावर टीका झाली तरी  तिकडे लक्ष न देता, जनतेची कामे करतच राहणार आहे. मतदारांच्या सुख दु:खात सहभागी होणार. जेव्हा जेव्हा मतदारसंघात असणार,  त्या त्या वेळी स्वत: प्रत्यक्ष भेटून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. लोकांना आपल्या समस्यांसाठी मला भेटण्यासाठी मध्यस्थांची आवश्यकता नाही आणि नसेल. 

आपले स्वतःचे व्हिजन घेऊन पुढे जाणार आहोत. मी कधीच आमदार म्हणून जनतेशी वागलो नाही. आणि  वागणार ही नाही. मला जनतेने निवडून दिले आहे ते त्यांची  सेवा करण्यासाठी. आम्ही पाच वर्षे जनतेचा सेवक म्हणून काम केले आणि येणाऱ्या पाच वर्षामध्येही  जनतेची सेवा करणार असल्याचे आ. निकम नाही सांगितले. 

 विकासाच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगितले की गोवळकोट येथील वाशिष्ठी खाडीत जल पर्यटन लवकरच सुरू केले जाणार आहे.  बहुतांशी गाळ काढून टाकण्यात आला आहे. जल पर्यटन या ठिकाणी चांगले होऊ शकते आणि पर्यटक चिपळूणमध्ये येऊन थांबू शकतात. यातूनच बाजारपेठेमध्ये आर्थिक उलाढाल होऊ शकते. 

त्याचबरोबर चिपळूण शहर गाळ मुक्त करायचा आहे आणि ते आपण करणारच असे त्यांनी सांगितले.  चिपळूणच्या  नळपाणी योजनेवर टीका केली.  पण आपण मागे न फिरता त्याचा पाठपुरावा करून ती योजना मंजूर करून घेतली. त्याचे टेंडर झाले तरीही टीका सोसावी लागली. मात्र, आचारसंहिते पूर्वी काम करण्याचा आदेश ही ठेकेदाराला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. अशी सुमारे अडीच हजार कोटींचा निधी  आणून आणि विकास कामे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात झाली आहेत आणि सुरु आहेत. आपण विधानसभेत याच विकास कामांवरती निवडून येणार याची खात्री त्यांनी व्यक्त केली.