आयर्लंडवरून 'ती' सावंतवाडीत मतदानासाठी आली

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 14:08 PM
views 527  views

सावंतवाडी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सावंतवाडी शहरात कळसुलकर हायस्कूल या  मतदान केंद्रावर आयर्लंड देशात नोकरीला असलेल्या  श्रेया शिवप्रसाद कुडपकर हीने मतदानाचा हक्क बजावला.  सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी शिवप्रसाद कुडपकर यांची ती कन्या आहे. 

तिचे शिक्षण सावंतवाडीतूनच झाले असून ती सध्या आयर्लंड देशात नोकरीला आहे. भोसले पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये डी फार्मसी कोर्स पूर्ण करून ती  डिग्रीसाठी आयर्लंडला गेली होती. तेथे श्रेया नोकरी निमित्त असून गेल्या काही दिवसांपूर्वीच  लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे सावंतवाडी मतदार संघात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली होती. कळसुलकर  हायस्कूल केंद्रावर तीन मतदानाचा हक्क बजावला.