शारदा मांजरेकर यांचे निधन ; माजी सभापती बाप्पी मांजरेकर यांना पत्नीशोक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2022 20:05 PM
views 387  views

वैभववाडी : वैभववाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्रीपाद शंकर उर्फ बाप्पी  मांजरेकर यांच्या पत्नी व माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांच्या मातोश्री शारदा श्रीपाद मांजरेकर यांचे सोमवारी मध्यरात्री १.२० वा. राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

आठ दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात सोमवारी नेले होते. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अखेर नातेवाईक त्यांना सोमवारी सायंकाळी नाधवडे येथे घरी घेऊन आले. मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. आज मंगळवार (दि.२०) ब्राम्हणदेववाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या शांत व मृदू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, दीर, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.