
सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी केक व चॉकलेट बनविण्याच प्रशिक्षण युवा परिवर्तन, अर्चना फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून फॉरेस्ट चौकी मळेवाड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मोठ्या संख्येने महिलांनी यात सहभाग घेतला. यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष सायली दुभाषी, निरीक्षक चित्रा बाबर देसाईसिद्धी परब स्थानिक महिला आदी उपस्थित होते. महिलांना उत्तम प्रशिक्षण घेत वाढदिवसाच औचित्य साधून स्वतः बनवलेला केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला.