तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून शरद पवार गटाचा निषेध !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 09:37 AM
views 169  views

सावंतवाडी : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या विरोधात व पक्षाच्या विरोधात पक्षपाती पणा केला. राजकीय दबावाखाली पक्ष व चिन्हाचा निकाल त्यांनी दिला असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करत तोंडाला काळी फीत बांधून हे मुक आंदोलन करण्यात आले.


यावेळी ज्यांनी अहोरात्र कष्ट करून गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या रोपट्याचे महाकाय वटवृक्षात रुपांतर केले. त्या पक्षाचे नाव व चिन्ह कोणताही विचार न करता हिसकावून घेतले. त्याच्या निषेध  मुक आंदोलन करून करत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचा त्यांनी निषेध केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे, प्रसाद रेगे, भास्कर परब, पुंडलिक दळवी, देवा टेंमकर, सचिन पाटकर, हिदायतुल्ला खान, योगेश कुबल, सावली पाटकर, अॅड.सायली दुभाषी, सुधा सावंत, सुमित भाईप, श्रावणी कोरगावकर, संजय भाईप, सुहास कुडाळकर, सलीम नाबर, तैसीफ आगा, इलियास आगा, लालू पटेल, सागर पालकर, वैभव परब, अवधूत मराठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.