
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शरद नारकर यांनी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची भेट घेतली. संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन श्री. खेबुडकर यांच स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नव्याने रविंद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित देयकांबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. प्रलंबित देयके लवकरात लवकर दिली जातील असं आश्वासन दिले, अशी माहिती श्री. नारकर यांनी दिली. यावेळी बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.