
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदि शंकर नाणेरकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शंकर सूर्यकांत नाणेरकर यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. उपक्रमशील आंबा बागायतदार व शेतकरी, एक सेवाभावी व दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या शंकर नाणेरकर यांचे यानिमित्त सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. निलेश मोहन पेडणेकर यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर .शंकर नाणेरकर यांची सहकार खात्याच्या विहित कार्यपद्धती नुसार उपस्थित. संचालक,ग्रामस्थ सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी यांच्या उपस्थितीत निवडणुक अधिकारी श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत बिनविरोध निवड करण्यात आली.
पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आभार तुकाराम तेली यांनी मानले. यावेळी कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हनकर, माजी चेअरमन निलेश पेडणेकर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, अध्यक्ष एकनाथ तेली, विद्यमान व्हाईस चेअरमन . भाऊ मुंबरकर यांनी आपले विचार मांडले. नवनियुक्त चेअरमन यांस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवक मंडळ चांदलवाडी (वरचीवाडी) कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ, ग्रा.पं. कुणकेश्वर, देवस्थान ट्रस्टकुणकेश्वर या संस्थांच्या वतीने मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला व शुभेच्छा दिल्या. कुणकेश्वर सेवा सोसायटीचे संचालक सुहास नामेरकर, विश्वनाथ तेली, सत्यवान धुरी, संदिप जोईल, शांताराम चव्हाण, तुकाराम लेली, तात्या वाळके माजी चेअरमन गोईम सचिव सौ. धुवाळी कर्मचारी वृंद, देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष पुंडलिक नाणेकर, अविनाश घाडी, माजी सरपंच गोविंद घाडी, चांदेल वाडी युवक मंडळ कार्यकर्ते व ग्रामस्थ सोसायटी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.