वजराट उपसरपंचपदी गाव विकास आघाडीचे शामसुंदर पेडणेकर

Edited by: दिपेश परब
Published on: March 13, 2024 11:56 AM
views 219  views

वेंगुर्ले : तालुक्यातील वजराट ग्रामपंचायत उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे शामसुंदर पेडणेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

   यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख यशवंत परब, सरपंच अनन्या पुराणिक, माजी उपसरपंच प्रियांका केरकर, नम्रता देसाई, दीपिका राणे, चेतन नाईक, उबाठा सेना शहर प्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, अनंत परब, मनोहर परब, तंटामुक्ती अध्यक्ष ताता परब, भास्कर पडणेकर, दिगंबर पेडणेकर, संदीप पेडणेकर, संजय देसाई, शेखर परब, साईप्रसाद केरकर, नितीन सावंत, सागर सोनसुरकर, अनंत गोंधळेकर, प्रथमेश पेडणेकर, वसंत पेडणेकर आदी उपस्थित होते.