वेंगुर्लेत श्यामराव काळे यांचा भाजपाच्या वतीने सत्कार...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 12:13 PM
views 243  views

वेंगुर्ले :  जेष्ठ नागरिक संघ, वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक श्यामराव काळे सर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

जेष्ठ नागरिक संघ , वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी रा.पा.जोशी सर होते,  परंतु वयोमानानुसार त्यांनी पदमुक्त होत नविन अध्यक्ष निवडण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यानुसार शामराव काळे सरांची एकमताने निवड करण्यात आली. तालुक्यातील ४०० सदस्य असलेल्या जेष्ठ नागरिक संघाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत .

शामराव काळे सरांनी ३६ वर्षे वेंगुर्ले हायस्कूल मध्ये सेवा बजावली. त्यापैकी २ वर्षे सुपरवायझर व १४ वर्षे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कामगिरी केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत वेंगुर्ले हायस्कूलचे नाव जिल्ह्यात रोशन केले . आता सेवानिवृत्ती नंतर संस्थेने त्यांच्यावर कोल्हापूर चर्च कौन्सिलचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.

नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , नगरसेवक प्रशांत आपटे, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ उपस्थित होते.