
वेंगुर्ला : स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांच्यावतीने साजरी करण्यात आली. याचनिमित्ताने शंभूज्योत रॅली काढण्यात आली. या रॅलीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त यशवंत गड रेडी ते मारुती मंदिर टांक येथे शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांच्यावतीने शंभूज्योत रॅली काढण्यात आली. १४ मे २०२४ रोजी स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमच शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.