
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग तेरा गावातून जाणार आहे. या सर्व गावांमध्ये खासदार नारायण राणे मी स्वतः व भाजप व मित्रपक्ष महायुतीतील सहकारी प्रत्येक गावात जाणार आहोत. या सर्व गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे समाधान झाल्याशिवाय या महामार्गाचे काम सुरू नये असे खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. सर्व लोकांचे हे सरकार असून त्यांचे प्रश्न पहिल्यांदाच सोडविले जातील. पर्यायी मार्ग उपलब्ध होत असेल तर त्याचाही विचार होईल. महामार्ग होईल पण लोकांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई ची रक्कम देऊन विकास करू अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी शक्तिपीठ बाधित गावातील शिष्टमंडळाशी बोलताना दिली.
हा शक्तिपीठ महामार्ग बांदा डेगवे आंबोली अशा प्रमुख तेरा गावातून जात आहे. बांदा शहरात ४५ ते ५० दुकाने निवासस्थाने कॉम्प्लेक्स भाषा इमारती बाधित होत असल्याने आंबोली बांदा आधी गावातील शिष्टमंडळाने खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माझी सभापती प्रमोद कामत, आंबोली सरपंच सावित्री पालयेकर बांदा सरपंच प्रियांका नाईक, दीपक नाटलेकर, कृष्णा गावडे, महादेव गावडे, गुरु सावंत आधी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान खासदार नारायण राणे यांची बांदा आंबोली आदी परिसरातील बाधित नागरिकांनी भेट घेत दुकाने घरे व्यवसाय जात असल्याबाबत लक्ष वेधले. जोपर्यंत या नागरिकांचे समाधान होत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम सुरू होणार नाही अशी ग्वाही त्यांनी या नागरिकांना दिली.
या ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू होणार नाही. या जनतेने सरकारला निवडून दिले असून, हे सरकार जनतेचे आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बांदा बाजारपेठ बाधित होत असेल तर त्याचाही विचार केला जाईल. पर्यायी मार्ग उपलब्ध होत असेल तर त्याचाही विचार केला जाईल. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या भागातील जनतेवर अन्याय होणार नाही, त्यांचे प्रश्न समजावून घेतले जातील, त्यांना विश्वासात घेतले जाईल, विकासाचे काम असल्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना अधिकची नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल ज्या ठिकाणी विकास आहे असा भाग वगळून पर्यायी मार्ग व त्याची पाहणी आपण करू चांगला निर्णय घेऊ व विकासाचा हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही शेवटी मंत्री नितेश राणे यांनी दिली.