
शक्तीपीठ महामार्ग विरोधात सभा
सावंतवाडी : १२ जिल्ह्यात शक्तीपीठ कोणी मागितलेला का ? ८६ हजार कोटी खर्च दीड-दोन लाख कोटींवर जाणार आहे. कंत्राट दारांचे पैसै द्यायला यांना जमत नाही. न मागितलेला रस्ता यांना करायचा आहे. उद्योगपतीच्या फायद्यासाठी रस्ते करायचे हे चालणार नाही. असं मत कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केले.
हा महामार्ग जबरदस्तीने लादला जात आहे. संकेश्वर-बांदाच पुढे काय झालं ? मुंबई- गोवा महामार्गाच काय झालं ? या रस्त्यांची परिस्थिती आदी बघा, ते व्यवस्थित करा असं श्री. शेख म्हणाले. १२ गावात सत्ताधारी पक्षाचे सरपंच आहेत. त्यामुळे लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांना आमिष दाखवत आहेत असाही आरोप त्यांनी केला.
शक्तीपीठ महामार्गा विरोधात आयोजित सावंतवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.