शैलेश परब यांचा आडेली जि. प. मतदार संघात संवाद दौरा

Edited by: दिपेश परब
Published on: December 07, 2023 20:03 PM
views 188  views

वेंगुर्ला :  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनखाली सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांचा वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघात संवाद दौरा संपन्न झाला. यावेळी उबाठा शिवसेनेच्या विविध महिला संघटिकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 

     शैलेश परब यांनी आडेली जिल्हा परिषदेतील वायंगणी, दाभोली, खानोली, मठ आणि आडेली या गावातील पुरुष, महिला कार्यकर्ते, युवा सैनिक यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व जेष्ठ शिवसैनिकांकडून त्यांचे मार्गदर्शन घेतले. 

     त्यावेळी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, विभाग प्रमुख उदय गोवेकर, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर यांच्यासाहित पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी विभाग समन्वयक पदी मनाली हळदणकर, विभाग संघटिका पदी स्वाती मांजरेकर, आडेली शाखा संघटिकापदी राधा बांदेकर, वायंगणी उपविभाग संघटिकापदी वर्षा धोंड, शाखा संघटिका पदी विद्या कांबळी, दाभोली उपशाखा संघटिका पदी सुकांती गोवेकर, कालिंदि पवार, अर्जना दाभोलकर, खानोली शाखा संघटिकापदी प्रतिमा खानोलकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.